Saturday, November 16, 2019

बिनपैशाचा तमाशा

आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चाललंय ते पाहून त्यापुढे कोणताही ब्लॉकबस्टर चित्रपट फिका पडावा .
मला राजकारणातील फारस कळत नाही परंतु एवढंच विचारावेसे वाटतंय की ज्या जनतेने निवडणुकी पूर्वी ज्या युती वर विश्वास ठेवून मतदान केले , निवडणूक निकाला नंतर त्या जनादेशाची सरळसरळ पायमल्ली होत नाहीये का ?
जनतेने शिवसेना भाजपच्या युतीला बहुमताचा आदेश दिला आहे आणि आता मात्र वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सर्व पक्षांकडून होतोय हा जनतेचा विश्वास घात नाही का ? हे संवैधानिक आहे काय ?
महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलेलं असताना , बळीराजा त्यात पुरता नाडलेला असताना सर्व प्रमुख नेत्यांनी असे गलिच्छ राजकारण खेळणे योग्य आहे काय ?
उद्या काही विपरीत समीकरण करून एखादं सरकार जनतेवर लादलं जाणार असेल तर जनतेने याला कडाडून विरोध करावा .
असा अधिकार या लोकशाही राज्यात जनतेला आहे का ???

सौ तनुजा मुळे

Saturday, March 30, 2019

विचार तर कराल

Hallo friends
सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहतायेत 2019 general elections म्हणजे जणू महासंग्राम अटीतटीची लढत आणि या सगळ्यासाठी तयार झालाय उभा देश ,
असो लोकशाही म्हणजे नेमेची येतो पावसाळा त्याप्रमाणे या निवडणूक येणारच परंतु या रणधुमाळीत पक्ष प्रवेशाची आणि पक्षांतराची जी काही लाट आली आहे त्यामुळे खूप संभ्रम मनात निर्माण होतायेत . नागरिक शास्त्रात शिकवलंय की समविचारी लोक एकत्र येऊन पक्ष बांधणी करतात ,
मग हे काल एखाद्या पक्षात दाखल झालेले केवळ पदाच्या अपेक्षेने पक्षांतर केलेले उमेदवार आणि केवळ त्यांच्या glamour चा फायदा उठवून त्यांना पक्षाचे तिकीट देणारे नेते ,यात कुठे आला विचार आणि पक्षानिष्ठा ? 
हे तर फक्त संधीसाधू च राजकारण . म्हणूनच सर्व जबाबदार मतदाराणी मात्र मतदान करताना जागरूक राहून अशा संधीसाधूनां त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे .

ता.क. -ही पोस्ट कोणताही पक्ष किंवा उमेदवारांना उद्देशून नाही, कारण सगळीकडे तेच चाललंय.